जेव्हा
जेव्हा मी
माझ्या व्यावसायिक
कारकिर्दीचा विचार करते तेव्हा दोन
चेहेरे माझ्या डोळ्यासमोर येतात. तेजस्विनी कानविंदे आणि जयंती पाटील.
त्या दोघींचा माझ्यावर, माझ्या कामावर फार प्रभाव आहे.
सोनियाचा जन्म
झाल्यावर
मी जवळपास दोन वर्ष नोकरी
करत नव्हते. एकदा सहज visiting faculty म्हणून सिंबायोसिस
मध्ये CV दिला आणि लगेचच
त्यांच्या टेलिकॉम मॅनेजमेंट ( SITM ) या नव्याने सुरु
होणाऱ्या इन्स्टिटयूट साठी मला मुलाखतीचं
बोलावणं आलं. मुलाखत छान
झाली आणि लगेच रुजू व्हायला
सांगितलं . मी रुजू झाले त्या दिवशी
नेमकी SITM ची प्रवेश परीक्षा
होती. पाहिलंच वर्ष. त्यामुळे
खूप गडबड होती. सगळे
फ्रंट ऑफिसमध्ये कामात होते आणि तिथेच
उभं राहून कानविंदे मॅडम, म्हणजे SICSR आणि SITM या दोन संस्थांच्या
डायरेक्टर, सगळ्यांना मदत करत होत्या. prospectus देत
होत्या , मुलांशी , त्यांच्या पालकांशी बोलत होत्या.
गोरा
वर्ण , सरळ नाक, पांढरी
साडी आणि एकदम आपल्या
आई -मावशी सारखं वाटावं असं व्यक्तिमत्त्व. मला
त्या पाहताक्षणीच आवडल्या. काही क्षणातच तारा
जुळाव्या असंच काहीसं झालं.
SITM नव्यानं
सुरु झालं होतं. faculty मी
एकटीच . बाकी सगळा SICSR चा
स्टाफ आणि faculty आम्हाला मदत करायचे. कानविंदे
मॅडम आय आय टी
पास आऊट. बरीच
वर्ष दिल्लीला C -DOT मध्ये सॅम पित्रोदांच्या मार्गदर्शनाखाली
काम केले होते . इंजिनीअरिंगच्या
विषयांमध्ये तज्ञ. SITMचा अभ्यासक्रम तयार
करताना , त्या क्षेत्रातील नामवंत
लोकांना भेटून त्यांच्याकडून प्रत्येक विषयाचा आराखडा आखताना त्या इतकं छान
मार्गदर्शन करत असत. गणित
त्यांचा आवडता विषय. वार्षिक बजेट बनवताना किंवा
कुठल्याही प्रकारचा हिशोब करताना कितीही मोठ्या रकमा असल्या तरी
त्या पटापट तोंडी हिशोब करत. सगळ्या प्रवेश
परीक्षांचे पेपर्सही त्या स्वतः सेट
करत. त्यातले सगळे प्रश्न आधी
सोडवून बघत.
विचारांमध्ये
सुस्पष्टता . वागण्यात किंवा बोलण्यात कुठल्याही प्रकारची संदिग्धता नाही. नेमक्या शब्दात सूचना देणार. नवीन वर्षासाठी prospectus तयार करणं
, जाहिरातीचा मजकूर ठरवणं कुठलंही काम त्या तितक्याच
सहजपणे करत आणि सर्वांकडून
करवून घेत. एकदम 'ट्रेंडी'
असा SITMचा फॉंट
आणि त्याचा विशिष्ट निळा रंग त्यांनीच
निवडला होता.
एका
वर्षात SITM मॉडेल
कॉलनीत हलले. नव्या ठिकाणचा ले-आऊट , फर्निचर
सगळ्या बाबतीत त्यांनी बारकाईनं लक्ष घातलं . सर्व
सोयी पाहिजेत पण मोकळी जागाही
हवी . फर्निचरची दाटी नको. लायब्ररी
मोठी , हवेशीर पाहिजे आणि हे सगळं
बनवताना पैश्याची उधळपट्टी नको या सगळ्या
बाबतीत त्या आग्रही होत्या
.
SITM च्या
त्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये आम्ही खूप नवनवीन गोष्टी
सुरु केल्या, स्टाफ वाढला , SCIT ही नवीन इन्स्टिटयूट
सुरु झाली . या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर
मॅडमबरोबर काम करताना
खूप शिकायला मिळालं त्याचबरोबर खेळीमेळीने काम करण्यात आनंद
आणि काम
छान झाल्याचे
समाधानही मिळाले.
कामाच्या
बाबतीत जितक्या काटेकोर तितकीच त्या
आमची सगळ्यांची काळजी घ्यायच्या. सोनिया लहान असताना आजारी
असली की सांगायच्या " आधी तुझ्या
बाळाकडे बघ . कामाचं राहू
दे ."
सोनिया
आता मोठी झाली तरीही
त्यांच्या आठवणीत ती बाळच आहे.
पूर्वीच्याच प्रेमाने
तिची चौकशी करतात .
आता
आमची भेट फोनवरूनच होते
. आमचा दोघींचा वाढदिवस बरोबर एक आठवड्याच्या अंतराने
येतो . मग त्या दिवशी
हमखास फोन आणि गप्पा
होतात. मी नवीन
काय करते हे जाणून
घ्यायची त्यांना उत्सुकता असते .
कानविंदे
मॅडम बरोबर मी जवळजवळ चार
वर्ष काम केलं आणि जयंती बरोबर
दहा वर्ष . दोघींच्यात कमालीचं साम्य आहे. दोघीही एकदम
साध्या. खूप शिकलेल्या, मोठ्या
पदावर असूनही कुठलाही बडेजाव नाही . सतत नवीन वाचायची,
शिकायची इच्छा , कामात चोख , दोघीही जितक्या प्रेमळ तितक्याच वेळ आली
तर कठोर निर्णय घेण्यात मागेपुढे पाहणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं
म्हणजे ठाम जीवनमूल्यं . तिथे
कुठलीही तडजोड नाही.
मी एम आय टी
त असताना जयंती तिथेच प्रोफेसर होती, पण तेव्हा आमची
फारशी ओळख नव्हती. पुढे
मी MISEM जॉईन केलं , मग
MBT , Tech M. या सगळ्या प्रवासात जयंतीकडून खूप शिकायला मिळालं
.
खरं
म्हणजे तिने समोर बसवून
असं आम्हाला कधीच काही शिकवलं
नाही. ती फक्त काय
काम करायचं आहे ते सांगायची
. कसं करायचं ते ज्याने त्याने
आपापलं ठरवायचं . काही मदत लागली
तर जयंती आहेच . एखादा मोठा प्रोजेक्ट असेल
तर प्रत्येकाने आपापले मत मांडायचे . सर्वानुमते
जे ठरेल ते फायनल
. तिने तिची मतं कधी
कोणावर लादली नाहीत . विचार करायचं , विचार मांडायचं आणि एखादी गोष्ट
पटली नाही तर वाद
घालायचं आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य होतं .
जयंती
खरी गुणग्राहक . कोणती व्यक्ती कुठल्या कामासाठी योग्य आहे, तिचा/ त्याचा
काय कल आहे हे
ओळखून ती त्याप्रमाणे सगळ्यांना
जबाबदारी द्यायची. लोकांना ठराविक 'रोल ' मध्ये न बसवता तिने
लोकांसाठी 'रोल 'तयार केले
. कोणाच्याही उणीवांकडे लक्ष देण्या पेक्षा ती त्यांच्या strengths वर जास्त
भरवसा ठेवत असे. एखाद्या
चांगल्या टीम मेम्बरला दुसऱ्या
डिपार्टमेंटमध्ये अजून चांगली संधी
मिळत असेल तर त्याच्या
वैयक्तिक प्रगतीसाठी ती त्यांना लगेच
तिकडे ट्रान्सफरची परवानगी देत
असे . IT क्षेत्रात हे बघायला मिळणं दुर्मिळच आहे .
जयंतीचा अजून
एक महत्वाचा गुण म्हणजे सगळ्या लोकांना बरोबर घेऊन पुढे जायचं . तिच्या बरोबर काम करणाऱ्या
प्रत्येकाला तिने पुढे जायची संधी दिली . आमच्याकडून
चुका झाल्या तर ती व्यवस्थित समजावून सांगत असे म्हणजे सहसा तशी चूक परत होत नसे .
कुठल्याही कठीण प्रसंगात ती खंबीरपणे आमच्या पाठीशी उभी रहात असे.
कितीही आव्हानात्मक
काम असो , आपण सगळे मिळून ते उत्तम प्रकारे करणारच असा तिचा ठाम विश्वास असे. ‘We
can Do it !!!’ हा तिचा मूलमंत्र. जयंती बरोबर काम करायला मिळतंय म्हणून लोक अगदी स्वेच्छेने
अशा मोठ्या प्रोजेक्ट्स मध्ये सामील होत असत . Job Family Framework, PCMMi असे कितीतरी
मोठे प्रोजेक्ट्स तिने अत्यंत यशस्वीपणे राबवले आणि शेवटी एक लीडर म्हणून कुठलंही श्रेय स्वतःकडे न घेता हे सगळं केवळ चांगल्या टीममुळेच शक्य झालं असं म्हणून पुढच्या
प्रोजेक्टसकडे वळली. A true Leader!!!
याच काळात Tech
M झपाट्याने मोठं होत गेलं. मुंबई - पुण्याबरोबरच
भारतात इतर सहा ठिकाणी ऑफिसेस सुरु झाली .
ट्रेनिंग टीम वाढत असतानाच जयंतीने processes, competency framework मजबूत करण्यावरही तितकाच भर दिला. कामात पूर्ण पारदर्शकता ( transparent work
culture) हा तिचा अजून एक गुण . आमची वार्षिक appraisal ची विशिष्ठ पद्धत होती . फक्त
गुणवत्ता आणि केलेलं काम एवढंच लक्षात घेतलं जायचं. सगळे टीम लीडर्स एकत्र बसून आणि
बरेचदा तासनतास भांडून फायनल रेटिंग ठरवत असत . अजूनही आम्ही तसेच भांडतो.
अजून पुढे जाऊन
ट्रेनिंग मध्ये काय बदल घडवायला पाहिजेत याची
संपूर्ण रूपरेखा तिच्याकडे तयार होती . त्या नुसार आमच्या कार्य पद्धतीत, आमच्या
ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्ही कायम बदल करत
गेलो. आपले काम अधिकाधिक चांगले कसे करता येईल यावर ही भर असे. आमचा हा सगळा पाया पक्का
झाल्याने ,आजही IT क्षेत्रात वेगाने होणाऱ्या
बदलांना सामोरे जाणे आम्हाला फारसे कठीण वाटत नाही.
असं म्हणतात
की माणूस जितका उंचीवर जातो, तेवढा तो एकटा पडत जातो. लोकांपासून दूर जातो. जयंतीच्या
बाबतीत हे अजिबातच लागू होत नाही. लोकांना
निरपेक्षपणे , मनापासून मदत करणं हा
जयंतीचा स्थायीभाव आहे. जयंतीचे ऑफिस म्हणजे मुक्तद्वारच होते. विश्वासाने लोक त्यांचं
मन मोकळं करत. अतिशय शांतपणे
ती दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेत असे , कधी कधी
अशा प्रसंगात ती स्वतः कशी वागली ते सहज सांगत असे . कुणीतरी आपलं ऐकतंय हे सुद्धा
लोकांना त्यांच्या प्रश्नातून बाहेर पडण्यासाठी
पुरेसं असे. प्रत्येक जण तिच्या केबिन मधून बाहेर पडताना एक positivity घेऊन बाहेर
पडत असे . मेंटॉर , कोच असं कोणतं बिरुद न
मिरवता, लोकांचे प्रश्न त्यांना स्वतःच सोडवायला
मदत करण्याची जयंतीची एक खास शैली होती. ‘लोकांच्या ओझ्याने पाठ दुखेल’ असं म्हणून
काही जण तिची चेष्टा करत पण तिला फरक पडत नसे . कोणाचं तरी भलं होतंय ना मग ठीक आहे
असं म्हणून ती सगळं हसून सोडून देत असे .
आपल्याला सगळ्यांनाच
माहित आहे की फार कमी स्त्रिया वरिष्ठ पातळीवर काम करतात . आणि ज्या काही तिथे पोचतात
त्यातल्या बऱ्याचशा कदाचित कायम पुरुष सहकाऱ्यांबरोबर राहिल्याने त्याच प्रकारे वागू
लागतात . ठामपणा आक्रमकतेकडे झुकू लागतो . बोलण्या वागण्यातील ऋजुता कमी होते पण जयंतीच्या बाबतीत हे कधीच अनुभवाला आले
नाही . या उलट एक स्त्री म्हणून असणारी दुसऱ्याबद्दलची ‘Empathy’ हा तिचा मला भावलेला फार मोठा गुण आहे.
Tech M च्या
सामाजिक उपक्रमांमध्ये ही तिचा सक्रिय
सहभाग असायचा . वेगवेगळ्या संस्थांची माहिती मिळवणं , त्यांना कुठल्याप्रकरची मदत पाहिजे आहे
ते बघून त्याप्रमाणे अहवाल
बनवून त्यांना मदत मिळवून देणं,
सगळं ती अतिशय तळमळीने
करत असे . पुढे Tech M Foundation स्थापन झाल्यावर तिने तितक्याच सहजपणे
सगळी जबाबदारी त्यांच्या सुपूर्त केली .
जयंती वेळेच्या
बाबतीत काटेकोर. तिची ऑफिसला यायची वेळ नक्की असे. आमच्या सगळ्यांच्या आधी येऊन सगळ्यांत
शेवटी ती घरी जात असे. कुठलंही काम करताना ती जीव ओतून करणार. पाट्या टाकणं किंवा नाव
मिळवण्यासाठी , प्रसिद्धीसाठी काही करणं हा तिचा पिंडच नाही . मागे मी म्हटलं तसं अगदी
ठाम जीवनमूल्ये . एकदा तिला स्वतःला खूप छान संधी आली होती पण ‘आपण ती संधी घेतली तर
दुसऱ्या कोणाची तरी नोकरी जाऊ शकते ज्याला नोकरीची नितांत गरज आहे’ , म्हणून तिने ती
संधी नाकारली आणि काही जणांचा रोषही ओढवून घेतला.
तशी ती
Super Woman किंवा 'अष्टभूजा’ च म्हटली पाहिजे. सासर -माहेरचा खूप गोतावळा . जयंतीचं
घर सगळ्यांच्या हक्काचं . कोणाचं आजारपण , कोणी हॉस्पिटलमध्ये , कोणाकडे लग्न. निमित्त
काहीही असो . सगळ्यांचा मुक्काम जयंतीकडे . आणि जयंतीपण सगळ्यांचं फार प्रेमाने , धावून
धावून करत असते .
तिच्या हातचे मराठवाड्यातले पदार्थ आम्हाला फार आवडतात . आम्ही
फक्त सांगायचा अवकाश की ती अंबाडीची भाजी , ठेचा , भाकरी , उडदाच्या डाळीची आमटी ,गुळाच्या
पोळ्या असं आमच्यासाठी खास बनवून आणायची .
कानविंदे मॅडम
किंवा जयंती . एखाद्या मोठ्या कुटुंबासारखं त्यांनी सगळ्या टीमला एकत्र बांधून ठेवलं
. कुटुंब म्हटलं की गैरसमज , लहानसहान वादावादी होणारच . पण ते तिथल्या तिथे मिटवून
पुन्हा आम्ही एकत्र . राजकारण,कुचाळक्या , एकमेकांचे पाय ओढणं अशा कुठल्याही गोष्टींना
थारा नव्हता आणि त्यांच्या या शिकवणुकीनं आम्ही सगळे आजही तितक्याच एकोप्यानं , गुण्यागोविंदाने
काम करतोय . आणि हो,जयंतीच्या कुटुंबाच्या व्याख्येत आमचे कुटुंबीय पण येतात . घरातल्या
सगळ्यांच्या वाढदिवसाला दर वर्षी पहिला मेसेज जयंतीचाच असतो.
तिच्याबरोबर
काम थांबवून आता काही वर्ष झाली. आता आम्ही वरचेवर भेटत नाही पण अजूनही पक्की खात्री आहे की कधीही कामात काही
अडलं किंवा अर्ध्या रात्री कसलीही मदत लागली तर जयंती आहेच.
या लेखाच्या
निमित्ताने खूप जुन्या आठवणींना उजाळा मिळाला . SITM, MBT, Tech M चे जुने दिवस आठवले.
एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतंय. आता फोन वर गप्पा न मारता त्यांना भेटायलाच हवं. तो
पर्यंत कानविंदे मॅडम आणि जयंतीला नवरात्रीच्या खूप शुभेच्छा !!
वैशाली फाटक
सप्टेम्बर २४,२०१७
मस्त.. जयंती मॅडम ला get-together च्या वेळी पाहिलं होतं .. आधी पण बरंच ऐकलं होतं.. feeling like missed working with her.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाFarach sundar Vaishali! Aashi loka mentor mhanoon milane he kharech mothe bhagyach mhanave lagel!!!
उत्तर द्याहटवाछानच!
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाSundar vyatimatv rekhatal aahe!! .ashi changali aani jiv lavnari manas aaushyat asan hich khari shrimanti
उत्तर द्याहटवा