'बाळाचे
पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीनुसार मी
शिक्षण क्षेत्रात जाऊन गोडबोले परंपरा
चालू ठेवणार हे माझ्या आई
वडिलांना फार लवकर कळले
असावे कारण 'फळा आणि खडू'
हा माझा आवडीचा खेळ
होता . एक कॅलेंडरच्या मापाचा
गुंडाळी करता येणारा छोटा
फळा आणि खडू यांच्या
सोबतीत मी किती तरी
वेळ एकटीच 'शाळा शाळा' खेळत
असे. पुढे खऱ्या शाळेत
जायला लागल्यावर मी माझी फळ्यावर
लिहायची हौस पुरती भागवून घेतली.
‘
५वीत मी पहिल्यांदाच
'मॉनिटर' झाले होते. रोज
सकाळी मुली
मोजून फळ्याच्या खालच्या कोपऱ्यात 'उपस्थित, अनुपस्थित, एकूण मुली' असा
लहानसा, ज्याला आजच्या भाषेत 'daily dashboard' म्हणता येईल तो लिहायचा.
ऑफ तास असेल तर
मुलींना गप्पं बसवायची जबाबदारी कोणावर तरी असायची. मग
बोलणाऱ्या मुलींची नावं फळ्यावर लिहायची.
बहुधा हे काम बाई
बडबड करणाऱ्या मुलींवरच सोपवत
आणि अर्थात मी त्यात असेच.
शाळेला तिन्ही मजल्यांवर लांबचलांब कॉरिडॉर होते. प्रत्येक वर्गाबाहेर लाकडाचे छान, मध्यम आकाराचे
फळे होते. वेगवेगळे सुविचार, कविता, सण उत्सवांची माहिती,
देशातल्या घडामोडी किती काय काय
असायचं त्या फळ्यांवर. बरेचदा
वर्गातील मुलीच तो
फळा बोलता ठेवत.
ऑफिसजवळच्या आणि पोर्चमधल्या जिन्याच्या जवळच्या फळ्यावर
महत्त्वाच्या सूचना असत. बोर्डात आलेल्या
मुलींचं अभिनंदन, शाळेत येणाऱ्या विशेष पाहुण्यांची माहिती व स्वागत, परीक्षेच्या
काळात शुभेच्छा, शिक्षकांना मिळालेले पुरस्कार, १५ ऑगस्ट -२६
जानेवारीला तिरंग्याचे चित्रं आणि देशभक्तीपर गीत आणि
मग कधीतरी पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन. आमच्या चित्रकलेच्या कर्वे बाई आणि मराठे
बाई ह्यांचं अक्षर इतकं सुंदर होतं!
काही विशेष दिवस असेल तर
त्या फळ्यावर लिहीत असत. तिथेच थांबून
त्यांचं लिहिणं किंवा साधी सोपी रेखाटनं
बघणं हे सुद्धा एक
शिक्षणंच असे. स्नेहसंमेलन किंवा इतर काही महत्त्वाचा
कार्यक्रम असेल तर व्यासपीठावर
एका बाजूला दीप प्रज्वलनासाठी समई
आणि दुसऱ्या
कोपऱ्यात एक स्टँडवर ठेवलेला
फळा. ईशस्तवन, स्वागतपद्य इथपासून आभार आणि अल्पोपहार
असा सगळा आजच्या भाषेतला
'अजेन्डा' त्या फळ्यावर असे.
शिकाऊ शिक्षकांसाठी 'लेसन
घेणं' हा एक प्रात्यक्षिक
परिक्षेचा भाग असायचा. एरवी
इतर बाई फळे भरून
लिहीत नसत. भाषा, इतिहास
हे तर जास्त बोलून
शिकवायचेच विषय. पण 'लेसन' घेणारे
शिक्षक मात्रं फळ्याचा इंच न इंच
वापरत. तासाच्या आधीच येऊन फळ्यावर
एका बाजूला आकृत्या किंवा चित्रं काढायचे, एखाद्या बाजूला तक्ते किंवा नकाशे टांगायचे आणि मग मध्ये
लिहायचे. कधी कधी 'लेसन पाडणे' हा प्रकारही आम्ही करत
असू आणि त्याबद्दल नंतर
बाईंची बोलणीही खात असू .
शाळेतून कॉलेजला गेल्यावर वर्ग आणि फळ्याचा
आकार वाढतच गेला. एका बाजूला बारीक
चौकोन आखलेले फळे बहुतेक वर्गात
असायचे. Zoology,
Botany च्या प्रयोगशाळेत त्या दिवशी करायच्या
प्रयोगाच्या इतक्या छान आकृत्या असत
की त्या बघून जर्नल
लिहिणे सोपे जाई.
पुढे मी शिकत
असताना सहज म्हणून मला
'स्टेट बँक ट्रेनिंग सेन्टर' मध्ये तिथल्या ऑफिसर्सना शिकवायची संधी मिळाली आणि
तिथल्या एका वरिष्ठ स्त्री
अधिकाऱ्यांनी मला 'फळ्याचा परिणामकारक
वापर' इतका छान समजावून
सांगितला की तो अजूनही
लक्षात आहे.
माझ्या वर्गातले कपाट |
दिवाळीच्या किल्ल्यावर गवत म्हणून किंवा तळ्याभोवतीच्या बागेत हिरवळ म्हणून वापरायचा. पुढे दातार क्लासला असताना मुलं बोलायला लागली, गणितं चुकायला लागली की दातार सर नेम धरून खडू मारल्याची इतकी बेमालूम ऍक्शन करत की खडू खरंच मारला की नाही ते फक्त त्या मुलालाच माहित.
या खडूंची अजून
एक आठवण. मी दुसरी-तिसरीत
असताना आमच्या जवळ राहणाऱ्या एका मुलाने खडू
बनवायचा उद्योग सुरु केला. शिक्षणात
फारशी गती नसल्याने त्याला
त्याच्या पायावर उभे करण्यासाठी त्याची
आई अधून मधून असे
काही प्रयत्न करायची. प्रत्येक गोष्टीचे मला कुतूहल असल्याने
खडू बनवण्यासाठी मी मदतीला येणार
हे मी स्वतःच सांगून
टाकले. खडू बनवायची पावडर
आणून ती विशिष्ट प्रमाणात
कालवणं, साच्यात घालणं, साचे गच्चीत उन्हात ठेवणं, मग मध्येच उघडून
खडू किती वाळलेत ते
बघणं असं सगळं झाल्यावर
पहिले खडू तयार झाले.
स्वभाव मुळातच बडबड्या असल्याने मी आधीच शाळेत
बाईंना सगळी माहिती देऊन
पहिली ऑर्डर पण मिळवली होती.
मग आमच्याच पेन्सिलच्या खोक्यातला
उरलेला भुस्सा घालून, त्या मुलाच्या आईने
मला खडूचा एक घरगुती खोका
बनवून दिला . त्यातले काही खडू चांगले
निघाले तर काही ओलसर राहिल्याने मधूनच तुटले. आपण दिलेले सगळे
खडू चांगले निघाले नाहीत म्हणून मला वाईट वाटले
आणि मी परस्परच बाईंना
थोडे खडू फुकट आणून द्यायचे
कबूल केले. त्या
मुलाचे खडूचे गिऱ्हाईक टिकवणे आणि त्याचा नवीन
उद्योग चांगला चालणे ही जणू काही
माझीच जबाबदारी आहे ही जाणीव त्या ७-८
वर्षाच्या वयात मला होती
याचं आज मलाच नवल
वाटतं. पुढे इतर अनेक
उद्योगांप्रमाणे त्याचा हाही प्रयत्न थांबला.
मी सिम्बायोसिसला काम
करत असताना एक माळकरी आजी
आजोबा खडू विकायला येत.
त्यांना मदत म्हणून आम्ही
नेहमी त्यांच्याकडून खडू घेत असू.
जेव्हा आमच्याकडचे
काळे फळे जाऊन व्हाईट
बोर्ड आणि
मार्कर्स आले तेव्हा आमचा
ऋणानुबंध संपला .
खडूच्या वापराने घशाला त्रास होतो, खडूची धूळ होते म्हणून
आता बऱ्याच ठिकाणी दगडी काळे फळे
जाऊन व्हाईट बोर्ड आले. जुने जाणार
… नवे येत राहणार. प्रत्येकाची
मजा वेगळी. अजूनही
कुठला नवीन प्रोजेक्ट, नवीन
काम चालू
करताना 'white boarding' ही आमची
पहिली पायरी
असते. फरक इतकाच की आता माझी फळ्यावर
लिहायची हौस पुरती फिटल्याने
मी ती संधी बाकीच्यांना
देते...
p.c. Google
p.c. Google
फार छान आठवणी...
उत्तर द्याहटवाखडू फळा छडी
पाठ झाली बाराखडी
केवळ खडू आणि फळा यावर किती सविस्तर लिहिलं आहेस. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. वडिलांच्या बदल्यांमुळे माझं बरचसं शिक्षण वेगवेगळ्या गावात आणि जिल्हा परिषदेच्या शाळांत झालं. तिथे चिंध्या भरलेली कापडी डस्टर्स मुलंच शिवून आणायची. ती मास्तरांना फेकून मारायलाही उपयुक्त असायची. तास चालू असताना खडू संपले तर वर्गातल्या काही विश्वासू मुलांना टीचर रूम मध्ये जाऊन ते घेऊन यायची परवानगी मिळायची. फळ्या खाली पडलेले खडूचे तुकडे वहीवर सांडलेली शाई टिपायला हमखास उपयोगी पडायचे. काही सर वर्गात आल्यावर काही न बोलता सावकाश संपूर्ण फळा पुसायचे, तेंव्हा आता आज काय संकट येणार आहे, कसा मूड आहे, या धास्तीने वर्ग हळूहळू शांत व्हायचा. जोपर्यंत त्यांचा चेहेरा दिसून अंदाज येत नाही तोपर्यंत 😊
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवातुमची शैली खूप ओघवती आणि भावणारी आहे. असेच सुंदर लिखाण चालू ठेवा. माझ्या लहानपणीच्या जाग्या झाल्या
वाह छान ! शब्द वर्णनात्मक वापरायची खुबी आहे त्यामुळे चित्र समोर उभे राहते! वाचकाला शाळेतच असल्याचा भास नक्कीच होईल!
उत्तर द्याहटवाSundar shabda rachana....bhintitil kapate, te khaduche tukade, duster...saglya athvni tajya zalya
उत्तर द्याहटवाYou write so well, Vaishali... Made me nostalgic.. Chalk and duster.. Miss those days
उत्तर द्याहटवावा वैशाली, तुझे लेख नेहमीच nostalgic करून जातात. माझी पाटी-पेन्सिल अजूनही आहे माझ्याकडे ....engineering च्या अभ्यासापर्यंत वापरली मी ती.
उत्तर द्याहटवाअसंच ब्लॉगिंग चालू ठेव !!
खडू आणि फळ्याची ही दुनिया मस्त रंगीबेरंगी आहे. गमतीदार अनुभव आणि सोबत आठवणींचा पट. त्यामुळेच वाचनीय....
उत्तर द्याहटवाSunder lihila aahe Vaishali. All the best.
उत्तर द्याहटवाSunder lihila aahe Vaishali. All the best.
उत्तर द्याहटवाखडूचा अजून एक वापर आम्ही करायचो. बाकाच्या कडेला right angle मध्ये एक बोगदा खणायचो (कर्कटक वापरुन) आणि त्यात खडूची भुकटी ठासून भरायचो (दारूगोळा). मग वरून जोरात फुंकर मारली की बाजूनी भुकटीचा लोट हवेत उडायचा. मध्यंतरी शाळेत गेलो होतो तेव्हा आवर्जून बाकावरचे बोगदे बघून आलो...
उत्तर द्याहटवाशाळेतील आठवणी जाग्या झाल्या. शाळेत असताना कधीतरी केलेला खडू फळ्याचा वापर पुढे डी एड ला उपयोगी पडला. अजूनही खडू फळ्याशी माझे घट्ट नाते आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद वैशाली.
खडू-फळा मुळे विस्मरणात गेलेल्या आठवणी जाग्या झाल्या. विशेषतः लेसन पाडणे, दातार सरांचं खडू फेकून मारणे, इ. फळ्यावर लिहायला मिळणे हे एक प्रिव्हिलेज होते.
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर आणि ओघवते लिखाण
वैशाली उत्तम,नेहमीप्रमाणेच...दातार सरांची आठवण भारीच
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंस वैशाली शाळेत फेरफटका मारून आणलस. धन्यवाद .शिक्षक दिनाच्या दिवशी फळ्यावर भरपूर लिहायची हौस अगदी पूर्ण व्हायची😄
उत्तर द्याहटवाखूप छान.
उत्तर द्याहटवावा, खूप सुंदर आठवणी !!!
उत्तर द्याहटवाखडू फळा डस्टर हे शाळेतले 'त्रिदेव' होते. मस्त लिहिले आहेस
उत्तर द्याहटवावैशाली खूप छान आणि सहज सोपं लिहितेस नेहमी. शाळेतल्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. छान वाटलं. ऑफ तासाला तू छान गाणी म्हणायचीस...
उत्तर द्याहटवामॅडम तुमच्या लिखाणाला सलाम!फळा आणि खडू च्या आठवणीनी खरोखरच मराठी शाळेमध्ये जाऊन बसल्यासारखे वाटले लहानपणी गुरुजी गप्पा मारणाऱ्या मुलांना खडू फेकून मारायचे आणि शेजारी समजत सुद्धा न्हवते खडू कधी मारला फक्त विद्यार्थ्याला समजायचे. प्राथमिक शाळेतल्या छोट्याशा पण खूप सुंदर अनुभवाने लहानपणीचे जिल्हापरिषदेचे शाळेतील दगडी भिंतीतले फळे यांच्या आठवणीने मन सुखावले आणि पुन्हा एकदा त्या कौलारू शाळेत जाऊन बसल्यासारखे वाटले थोडक्यात काय, कितीही इलेक्ट्रॉनिक्स व्हाईट बॉर्डस आणि कलरफुल मार्कस असले तरीही फळा आणि खडू च्या जोडीची मजाच काही और होती! मुलांच्या पुढे येणाऱ्या पिढीला सुद्धा आद्यवत सोईबारोबराच थोडा थोडा मायेचा ओलावा, आपलेपणा, थोडी थोडी माणसांची ओळखही शाळेतून व्हावी अशी मनापासून इच्छा आहे:)
उत्तर द्याहटवाखूप छान वैशाली, शाळा-कॉलेजमधल्या अनेक आठवणी जाग्या झाल्या
उत्तर द्याहटवाShaletlya eka eka vastuvar kiti chchan lihite ahes Vaishali. Ashich lohit raha.
उत्तर द्याहटवाशाळेत असताना कधी डोक्यात आले नाही. पण नंतर कळले की शिक्षक / शिक्षिका फळ्या चा किती वापर करायचे आपल्याला messages देण्या साठी. Especially कॉरिडॉरमध्ये असलेले फळे.
उत्तर द्याहटवाआणि आम्ही खडू मध्ये कोरीवकाम करायची आपापसात स्पर्धा लावायचो. त्या करता शिक्षकांच्या बॉक्स मधून खडू गुल करायचो.
आजही व्हाइट बोर्ड वर लिहिणे मला फार आवडते. कुठल्याही मीटिंग मध्ये मी generally बोर्डाचा ताबा घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. 😉
शाळेत असताना कधी डोक्यात आले नाही. पण नंतर कळले की शिक्षक / शिक्षिका फळ्या चा किती वापर करायचे आपल्याला messages देण्या साठी. Especially कॉरिडॉरमध्ये असलेले फळे.
उत्तर द्याहटवाआणि आम्ही खडू मध्ये कोरीवकाम करायची आपापसात स्पर्धा लावायचो. त्या करता शिक्षकांच्या बॉक्स मधून खडू गुल करायचो. 😉
आजही व्हाइट बोर्ड वर लिहिणे मला फार आवडते. कुठल्याही मीटिंग मध्ये मी generally बोर्डाचा ताबा घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. 🙂